कला ही माझ्यासाठी केवळ एक व्यवसाय नाही तर ती माझ्या वैचारिक व वैयक्तिक जीवनाची प्रेरणा आहे.

मी बालपणापासून माझ्या कलात्मक प्रवासाबद्दल काही आठवणी सांगू इच्छितो.

मला लहानपणापासूनच कलेबद्दल स्वाभाविक प्रेम, आकर्षण होते, परंतु माझे चौथी पर्यंत चे प्राथमिक शिक्षण हे माझ्या आजोळी झाले आहे. या दरम्यान माझ्या हाती पहिली पाठी पेन्सिल आली तेव्हा पासून मी घोड्याचे चित्र रेखाटू लागलो व घोड्याची मेमेक्री करू लागलो. याच काळात मी गणेश मंडळातील सांस्कृतिक कार्यक्रमात अभिनय करण्यास सुरवात केली. सुरुवातीला या माझ्या कला गुणाचे होणारे कौतुक कमी होत गेले त्याचे कारण. कलेव्यतिरिक्त, मला इतर विषयांमध्ये कधीच फारसा रस नव्हता, ज्यामुळे त्या विषयावर माझी सुमार प्रगती होत होती. इयत्ता पाचवी ला मी माझ्या वडिलांच्या गावी म्हणजे करवीर तालुक्यातील कसबा आरळे येथे आलो. माध्यमिक विद्यालय, कसबा आरळे या विद्यालयात प्रवेश घेतला. पण पाचवी ते दहावी हा काळ माझ्यासाठी अत्यंत कठीण ठरला होता. कारण मला शाळेतील शिक्षक,विद्यार्थी यांचं बरोबर गावातील लोकांनी माझ्या सर्व कला गुणांची चेष्टा, मस्करी, अपमान केला.

या दरम्यान कलाशिक्षक कुंभार सर यांनी मला शाळेची भिंतीं चित्रे काढण्याची संधी दिली. या शाळेतील चित्रामुळे माझा आत्मविश्वास वाढला.

मला प्रसिद्ध चित्रकार संजय शेलार यांच्या कडे हाताखाली चित्रकलेचे धडे घेण्याची इच्छा मी दहावी पास झाल्यावर मला मिळाली.

आमची बेताची परिस्थिती मुळे आई वडिलांनी कोल्हापूरला राहण्याचा निर्णय घेऊन गाव सोडले होते. त्यामुळे मी कला महाविद्यालयात शिक्षण न घेता शेलार सरांच्या स्टुडिओत मदतनीस म्हणून काम करू लागलो. दहावी नंतर एक दोन वर्षांनी मी माझ्या अठराव्या वाढदिवसानिमित्त 2 एप्रिल 2010 साली पहिले चित्र प्रदर्शन कोल्हापूर मध्ये भरवले. आणि स्वतंत्र चित्रकार म्हणून नावलौकिक व व्यावसायिक कलाप्रवास सुरू केला. याच काळात माझ्या अनेक कलाकृतींना पारितोषिके मिळालीत. पुढे नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, जहांगीर आर्ट गॅलरीसह राज्यातील अनेक ठिकाणी चित्र प्रदर्शन भरव आहे.
इयत्ता सातवी मध्ये मी एक लघू नाटीकेचे लिखाण केले होते. सातवी ते दहावी या दरम्यान मी शाळेच्या सांस्कृतिक कार्यामात सक्रिय होतो. पहिल्या चित्र प्रदर्शना नंतर लेखन, दिग्दर्शनाचे गुण चित्रपट क्षेत्राकडे आकर्षित करू लागले होते.

2010 साली मला स्टिल फोटोग्राफर म्हणून पहिल्या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा प्रवास पुढे वाढत गेला आणि मी कला दिग्दर्शक, स्टोरी बोर्ड आर्टिस्ट, लेखक, निर्माता, छायाचित्रकार आणि दिग्दर्शक म्हणून लघुपट, मालिका आणि चित्रपटाचा प्रवास सुरू आहे.

आज देश विदेशात अनेक रसिकाच्या कडे माझ्या कलाकृती पाहायला मिळतात. तसेच मी दिग्दर्शन केलेल्या अनेक लघुपटाना देश विदेशात नामांकन व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 2024 व 2025 साली सलग दोन वर्षे मधुबाला व डोही हे लघुपट फिल्मफेअर अवॉर्ड साठी नामांकन मिळाले आहे.

मी कला क्षेत्रात फक्त काम करत नाही तर ते माझे जीवन आहे असे मी मानतो.

Art is not just a profession for me, it is the inspiration behind my intellectual and personal life

I would like to share some memories from my artistic journey that began in my childhood.

Since childhood, I had a natural love and attraction towards art. My primary education up to the fourth grade was completed at my maternal grandparents place. This was the first time , I held a slate pencil in my hand and began drawing pictures of horses. I even started imitating their sound. Around the same period, I also started performing in cultural programs organized by the Ganesh Mandal in our locality.
Initially, my artistic abilities were appreciated, but gradually the appreciation reduced. The reason was that apart from art, I never had much interest in other academic subjects, and therefore my performance in those subjects remained average.

In the fifth grade, I moved to my father’s village, Kasba Arale in Karveer Taluka, and took admission in Madhyamik Vidyalaya, Kasba Arale. However, the period from fifth to tenth standard was extremely difficult for me. My teachers, classmates , and even people in the village often mocked, laughed off, and insulted my artistic talents.

During this time, my art teacher, Kumbhar Sir, gave me an opportunity to paint drawings on the school walls. This experience boosted my confidence greatly.
After passing the tenth standard, I got the opportunity to learn painting under the guidance of the eminent painter Sanjay Shelar. Due to our modest financial condition, my parents decided to move to Kolhapur and leave the village. Because of this situation, instead of pursuing formal education in an art college, I began working as an assistant in Shelar Sir’s studio.

One or two years after completing the tenth standard, on the occasion of my eighteenth birthday, I organized my first painting exhibition in Kolhapur on 2 April 2010 and began my professional artistic journey as an independent painter. During this period, many of my artworks received awards and appreciation. Later, I organized exhibitions at several places across Maharashtra, including Nehru Centre Art Gallery and Jehangir Art Gallery.

Back in the seventh grade, I had written a short play. From seventh to tenth standard, I was actively involved in cultural activities at school. After my first painting exhibition, my interest in writing and directing gradually drew me towards the film industry.

In 2010, I got my first opportunity to work as a still photographer in a Marathi film. From there, my journey expanded further, and I began working as an art director, storyboard artist, writer, producer, photographer, and director in short films, television serials and films.

Today, my artworks can be seen with art enthusiasts across India and abroad. Several short films directed by me have received nominations and awards at national and international film festivals. In 2024 and 2025, two of my short films, Madhubala and Dohi, received nominations for the Filmfare Awards in consecutive years.

I believe that I am not merely working in the field of art—art itself is my life